कोलकात्यात बांग्लादेश उच्चायुक्तालयाबाहेर गोळीबार, परिसरात खळबळ

96

पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकाता येथे झालेल्या गोळीबारामुळे एकच खळबळ उडाली आहे. कोलकाता येथे असलेल्या बांग्लादेशच्या उच्चायुक्तालयाबाहेर गोळीबार झाला असून त्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून,पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

बांग्लादेशच्या उच्चायुक्तालयाबाहेर गोळीबार

मिळालेल्या माहितीनुसार, झालेल्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला असून, पोलिसाने आत्महत्या केली आहे. बांग्लादेशच्या उच्चायुक्तालयाबाहेर शुक्रवारी दुपारच्या सुमारास अचानक गोळीबार झाला. यावेळी एका पोलिसाकडून करण्यात आलेल्या या गोळीबारात मोटारसायकलवरुन जाणा-या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर यानंतर त्या पोलिसाने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे.

(हेही वाचाः FIR नंतर ओवैसींना आणखी एक झटका, AIMIM च्या 30 जणांना अटक)

तपासाला सुरुवात

या धक्कादायक घटनेनंतर आता पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, याबाबतचा अधिक तपास करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. या गोळीबारामागचं आणि त्यानंतर पोलिसाने केलेल्या आत्महत्येचं कारण कळू न शकल्याने आता या प्रकरणाचे गूढ वाढले असल्याचे सांगण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.