कोल्हापूर येथील महिलेला एंजटच्या माध्यमातून पुण्यात आणून तिला पैशांचे आमिष दाखवून तिची किडनी अनोळखी रुग्णावर प्रत्यारोपित केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील रूबी हॉल क्लिनीकमध्ये हा प्रकार घडला आहे.
महिलेविरोधात दिली तक्रार
शस्त्रक्रिया झाल्यानंतर एजंटसोबतचा आर्थिक व्यवहार फिसकटल्याने संबंधित महिलेने त्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर हा तस्करीचा प्रकार उजेडात आला. दरम्यान, रूबी हॉल प्रशासनानेही या प्रकरणाबाबत पोलिसांत धाव घेत महिलेविरोधात तक्रार दिली आहे.
( हेही वाचा: दिल्लीत खलबतं! पवारांनी घेतली मोदींची भेट, कोणत्या विषयावर झाली चर्चा? )
गरज ओळखून केली फसवणूक
मिळालेल्या माहितीनुसार, सारिका गंगाधर सुतार ही कोल्हापूरमधील जयसिंगपूर येथे राहते. तेथे ती हॉटेलमध्ये चपात्या लाटून आपल्या दिव्यांग मुलासह दोन मुलांना सांभाळते. पतीने काही वर्षापूर्वीच तिची साथ सोडली आहे. तिच्या डोक्यावर कर्ज असल्याने व मुलांच्या भविष्याच्या चिंतेने सतत तणावात असायची. याच दरम्यान वर्षभरापूर्वी तिला एक महिला भेटली तिने तिची पैशाची गरज ओळखून रविभाऊ नावाच्या एंजंटाची ओळख करून दिली.
Join Our WhatsApp Community