पुण्यात कोयता गँगची दहशत दिवसेंदिवस वाढत असून, अल्पवयीन मुलांच्या हातून गुन्हे घडू लागले आहेत. पुणे शहराबरोबरच उपनगर आणि ग्रामीण भागात तरुण आणि मुले कोयते घेऊन फिरताना दिसत आहेत.
( हेही वाचा : मंदिरांना पुनर्वैभव प्राप्त करून देण्याचा मार्ग म्हणजेच ‘महाराष्ट्र न्यास मंदिर परिषद!’)
कोयता खरेदीसाठी आधार कार्ड बंधनकारक!
किरकोळ कारणावरून झालेल्या वादात कोयत्याचा सर्रास वापर होतोय. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कोयता विकत घेणाऱ्यांचे आधार कार्ड घेऊन, कोयता कशासाठी घेत आहेत, याची माहिती ठेवण्याचे बंधन विक्रेत्यांवर घालण्यात आले आहे.
विक्रेत्यांवर बंधन
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या हातात कोयता पडू नये, म्हणून पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी नवी शक्कल लढविली आहे. कोयते विकणाऱ्यांना कोणताही परवाना लागत नाही. मात्र, कोण आणि कशासाठी कोयते विकत घेतो, याची नोंद विक्रेत्यांना करायला सांगण्यात आले आहे. कोयता विकत घेणाऱ्यांचे आधार कार्ड घेऊन तो कशासाठी घेत आहे, याची माहिती ठेवण्याचे बंधन विक्रेत्यांवर घालण्यात आले आहे.
पुणे पोलिसांनी आता कोयत्या खरेदी-विक्रीवरच बारीक लक्ष ठेवण्यास सुरूवात केली असून आधार कार्डशिवाय कोयत्याची विक्री करू नये अशी सक्त ताकीद पुणे पोलिसांनी विक्रेत्यांना दिली आहे.
Join Our WhatsApp Community