Aaditya L1 : आदित्य एल-1 ने काढला सेल्फी आणि पृथ्वी अन् चंद्राचेही काढले फोटो

इस्रो कडून व्हिडिओ व्हायरल

186
ISRO : आदित्य एल-1 ने काढला सेल्फी आणि पृथ्वी अन् चंद्राचेही काढले फोटो
ISRO : आदित्य एल-1 ने काढला सेल्फी आणि पृथ्वी अन् चंद्राचेही काढले फोटो

आदित्य एल-1′ (Aaditya L1) हा उपग्रह सध्या पृथ्वीच्या कक्षेत पोहचला आहे. याठिकाणाहून त्याने पृथ्वी आणि चंद्राचे फोटो काढले आहेत. सोबतच त्याने सेल्फी देखील क्लिक केला आहे. इस्रोने एक व्हिडिओ पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. इस्रोने (ISRO) आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये आदित्य उपग्रहाने काढलेला सेल्फी व्हिडिओ आणि पृथ्वी आणि चंद्राचा व्हिडिओ दिसत आहे.

आदित्य उपग्रहावरील VELC आणि SUIT हे पेलोड देखील या सेल्फीमध्ये दिसत आहेत. ४ सप्टेंबर रोजी हा व्हिडिओ टिपण्यात आला होता, असंही यात सांगितलं आहे. आदित्य एल-1 ही भारताची पहिलीच सौर मोहीम आहे. २ सप्टेंबर रोजी याचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं होतं. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे. यामध्ये आदित्य हा उपग्रह पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर दूर असणाऱ्या एल-1 या लॅग्रेंज पॉइंटवर प्रस्थापित करण्यात येईल.

(हेही वाचा : Maratha Reservation : सरकारने त्यांच्या अध्यादेश मध्ये “ती ” अट वगळावी ,मग आम्ही आंदोलन मागे घेऊ – मनोज जरांगे)

सध्या आदित्य उपग्रह हा पृथ्वीच्या बाहेरील कक्षेत आहे. १८ सप्टेंबर पर्यंत तो पृथ्वीभोवती फेरी मारेल. यानंतर पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून तो एल-1 पॉइंटच्या दिशेने प्रवास सुरू करेल. यासाठी सुमारे चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. एल-1 हा अंतराळातील असा पॉइंट आहे, जिथे पृथ्वी किंवा सूर्याचं गुरुत्वाकर्षण जाणवत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी ठेवलेली वस्तू स्थिर राहते. यामुळेच या पॉइंटची निवड करण्यात आली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.