आमिर खानच्या Lal Singh Chaddha चित्रपटावर बंदीची मागणी! का सुरु आहे #BoycottLaalSinghChaddha ट्विटर ट्रेंड?

अभिनेता अमीर खान मागील काही वर्षांपासून सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात सापडला आहे. जेव्हा त्याच्या पत्नीने ‘आम्हाला भारतात असुरक्षित वाटत आहे’, असे वक्तव्य केले होते, तेव्हा अमीर खान सर्वाधिक टीकेचा धनी बनला होता. आता त्याचा लालसिंग चड्ढा हा नवा चित्रप ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे, त्या आधीच त्याच्यावर बंदी घालण्याची किंवा त्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे. विशेष म्हणजे ट्विटरवर  #BoycottLaalSinghCaddha हा ट्रेंड सुरु झाला आहे.

का करत आहे लोक विरोध? 

मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान याचा लाल सिंग चड्ढा चित्रपट रिलीज होण्याआधीच अडचणीत सापडला आहे. ११ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आता या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे. कारण आमिर खानच्या जुन्या विधानांवर लोक अजूनही नाराज आहेत. एवढ्या नकारात्मक वातावरणातही आमिरचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कशी कमाई करतो हे पाहावे लागणार आहे. आमिर खान हा मागील काळापासून सतत वादात सापडला आहे, त्यामुळे मागील ४ वर्षांपासून तो रुपेरी पडद्यापासून लांबच राहिला होता. आता लाल सिंग चड्ढा या चित्रपटाद्वारे तो पुनरागमन करत आहे. आमीर खान, ज्याच्या चित्रपटाच्या रिलीजची लोक त्याच्या नजरेने वाट पाहत असत, ज्याच्या चित्रपटाची सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा व्हायची, त्याच आमिर खानचा चित्रपट लाल सिंग चड्डासोबत मात्र विशेष काहीही घडताना दिसत नाही.

(हेही वाचा पालघरमध्ये हिंदूंचे धर्मांतर करण्याचा डाव उधळला; चार ख्रिस्त्यांना अटक

लालसिंग चड्ढा न पाहण्याचे आवाहन

या चित्रपटाला विरोध करण्यासाठी आता ट्विटरवर #BoycottLaalSinghCaddha हा ट्रेंड सुरु झाला आहे. आमिर खान आणि करीना कपूरचा चित्रपट न पाहण्याचा ट्रेंड जोरात सुरू आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी आमिर खानच्या चित्रपटाबद्दल लोकांमध्ये नाराजी असण्यामागे आमिर खान आणि करीना कपूर यांनी केलेली जुनी वक्तव्ये कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.

काय म्हणत आहेत नेटकरी? 

एक नेटकऱ्याने म्हटले की, तुमच्या पत्नीने सांगितले की, भारतात राहणे सुरक्षित नाही. मग तुम्ही तुमचा चित्रपट इथे का रिलीज करत आहात? आणखी एक व्यक्ती म्हणतो की, मी सर्वांना आवाहन करतो की त्यांनी लाल सिंग चड्ढा यांच्यावर कष्टाचे पैसे खर्च करू नयेत.

या नेपो मुलांवर, ड्रग्स घेणारे, माफियांवर बहिष्कार घालण्याची वेळ आली आहे. मी म्हणेन तुमचा पैसा गरजू लोकांवर खर्च करा. काही वर्षांपूर्वी आमिरने शिवलिंगावर दूध अर्पण करणे व्यर्थ असल्याचे म्हटले होते.

त्याचवेळी करीना म्हणाली होती – आमचे चित्रपट पाहू नका, कोणीही जबरदस्ती करत नाही. दोन्ही सेलिब्रिटींच्या या जुन्या विधानांचा संदर्भ देत लाल सिंह चड्ढा यांच्यावर बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे.

नेटकऱ्यांनी आमिरवर हिंदू संस्कृतीचा अपमान आणि विटंबना केल्याचा आरोप केला आहे. काही लोकांचे म्हणणे आहे की लाल सिंग चड्डा पाहण्यापेक्षा फॉरेस्ट गंप हा मूळ चित्रपट पाहणे चांगले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here