28 प्रमुख बॅंकांकडून तब्बल 22 हजार 482 कोटींचे कर्ज घेऊन, हे पैसे 100 बनावट कंपन्यांद्वारे फिरवून त्यातून वैयक्तिक मालमत्ता निर्माण केल्या प्रकरणी ईडीने जहाज बांधणी क्षेत्रातील एबीजी शिपयार्ड कंपनीच्या मुंबई, पुणे, सुरतसह एकूण 26 कार्यालयांवर मंगळवारी धाडी घातल्या. यात मुंबईमधील 24 ठिकाणांचा समावेश आहे.
सध्या तपास सुरु
मिळालेल्या माहितीनुसार, 28 बॅंकांच्या एकत्रित गटाने कंपनीला सन 2005 ते 2012 या कालावधीमध्ये 22 हजार 842 रुपयांचे कर्ज दिले होते. मात्र कंपनीचे अध्यक्ष व अन्य संचालकांनी कर्जापोटी प्राप्त झालेली ही रक्कम 100 बनावट कंपन्यांच्या माध्यमातून देशात आणि परदेशात फिरवत त्याद्वारे वैयक्तीक मालमत्ता उभी केली. 7 फेब्रुवारी 2022 रोजी सीबीआयने या कंपनीवर एफआयआर दाखल केला. त्याच आधारे ईडीने धाडी घालत आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. कर्जापैकी किती रक्कम कुठे व कशी वळवली, या बनावट कंपन्या कशा स्थापन केल्या, त्यात कोणत्या संचालकाची काय भूमिका होती, याचा तपास सुरु आहे.
( हेही वाचा: रेल्वेमधील गर्दीमुळे पडून जखमी झाल्यास, रेल्वेच देणार नुकसान भरपाई! )
कंपनी दिवाळखोर
एबीजी शिपयार्ड या कंपनीचे मुख्यालय गुजरातमधील दहेज आणि सुरत येथे आहे. देशातील सर्वात मोठी खासगी जहाज बांधणी कंपनी, अशी ओळख होती. अलीकडेच कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली आहे.
Join Our WhatsApp Community