अभ्यंकर परिवाराने गणपतीच्या सजावटीतून मांडले वीर सावरकरांचे अंदमान पर्व

102

नाशिकमधील अभ्यंकर परिवाराने यंदाच्या गणेशोत्वाच्या समोरील सजावटीच्या माध्यमातून स्वातंत्र्यसैनिकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आदरांजली वाहिली आहे.

अंदमान पर्वात वीर सावरकरांनी सहन केल्या यातना

वीर सावरकर यांना काळ्यापाण्याची शिक्षा दिल्यावर त्यांना अंदमान येथील सेल्युलर जेलमध्ये ठेवण्यात आले होते, तिथे त्यांना असह्य यातना सहन कराव्या लागल्या. या जेलमध्ये वीर सावरकर यांना ४ जुलै १९११ ते २१ मे १९२१ या कालखंडात राहावे लागले होते. त्यावेळी वीर सावरकर यांना कोलू फिरवून नारळाचे तेल काढावे लागत होते, वीर सावरकर यांना त्यांना सुचलेले विचार तुरुंगातील भिंतीवर लिहावे लागत होते, या जेलमध्ये वीर सावरकर यांना हाताला बेड्या बांधून तासनतास उभे राहावे लागत होते. या सर्व प्रसंगांचा देखावा इथे उभारण्यात आला आहे.

(हेही वाचा cyrus mistry accident death : अपघाताची चौकशी करण्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आदेश)

देशासाठी वीर सावरकरांनी सहन केलेल्या यातना लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने असा देखावा उभारून एक प्रकारे अभ्यंकर परिवाराने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन केले आहे. हा संपूर्ण देखावा अभ्यंकर परिवाराने घरी स्वतः तयार केलेला आहे. वीर सावरकर यांनी अंदमानात देशासाठी सहन केलेल्या यातना काही प्रमाणात का होईना लोकांपर्यंत निश्चितच पोहोचतील, अशी अशा अभ्यंकर परिवाराला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.