व्यंकटेश्वरन दक्षिणामूर्ती (Venkateswaran Dakshinamurthy) म्हणजेच व्ही. दक्षिणमूर्ती (V. Dakshinamoorthy) हे मल्याळम, तामिळ आणि हिंदी चित्रपटांचे एक सुप्रसिद्ध कर्नाटकीय संगीतकार आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांनी प्रामुख्याने मल्याळम चित्रपटांना संगीत दिले आहे. त्यांनी जवळपास १२५ चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या ६३ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी १४०० गाणी संगीतबद्ध केली आहेत. (V. Dakshinamoorthy)
व्ही. दक्षिणमूर्ती (V. Dakshinamoorthy) यांचा जन्म ९ डिसेंबर १९१९ साली एका ब्राह्मण कुटुंबात झाला. संगीतातील त्यांची आवड त्यांच्या आईमुळे निर्माण झाली. त्यांच्या आईने ते लहान असतानाच त्यांना कीर्तन शिकवले. ते १० वर्षांचे असताना त्यांना त्रिवंद्रममधील वेंकटचलम पोट्टी यांनी त्यांना कर्नाटकी संगीत शिकवले. ते १३ वर्षांचे असताना अंबालापुझा श्री कृष्ण मंदिरात त्यांनी पहिला सार्वजनिक कार्यक्रम सादर केला. (V. Dakshinamoorthy)
(हेही वाचा – Lionel Messi : लिओनेल मेस्सीच टाईम्सचा वर्षातील सर्वोत्तम ॲथलीट)
१९४८ मध्ये त्यांनी चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला. १९५० मध्ये नल्ला थंका हा त्यांचा पहिला चित्रपट आला. दक्षिणामूर्ती (V. Dakshinamoorthy) यांनी भगवान विनायकावर एक गाणे रचावे अशी निर्मात्यांची इच्छा होती आणि त्यांनी चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केलेले ते पहिले गाणे होते. त्याच काळात त्यांनी कलामंडलम येथील “द ऑपेरा” साठी संगीत तयार केले. त्यामध्ये त्यांनी ८ ऑपेरा आणि ३० नृत्यनाटकांना संगीत दिले. (V. Dakshinamoorthy)
त्यांनी थियागब्रह्म, आत्मा धीपम, सत्य मित्रम अशी तीन पुस्तके लिहिली आहेत. संगीत क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल सन्मान करण्यासाठी त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त केरळच्या मक्रेरी मंदिरात त्यांच्या १०८ रचनांवर “रागभरणम” या नावाचे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. त्यांना २०१९–केरळ राज्य चित्रपट पुरस्कार, स्वाती संगीत पुरस्कार, रामाश्रम उन्नीरीकुट्टी पुरस्कार, महात्मा गांधी विद्यापीठाद्वारे मानद डॉक्टरेट, जीवनगौरव पुरस्कार-मिर्ची, मल्याळम चित्रपट संगीतातील आजीवन योगदानासाठी स्वरालय येसुदास पुरस्कार, भारतीय संगीतातील अतुलनीय योगदानासाठी अभय देव पुरस्कार, केरळ सरकारकडून जे.सी. डॅनियल पुरस्कार, उपराष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते पहिला “कामुकारा पुरस्कार”, भारतीय चित्रपटसृष्टीतील ५० वर्षांच्या सेवेसाठी इंडियन टॉकीज गोल्डन जुबिली पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. (V. Dakshinamoorthy)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community