परमबीर सिंग अखेर प्रकटले! कांदिवलीत गुन्हे शाखेकडून चौकशी

खंडणीचे आरोप असलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना मुंबई न्यायालयाने ‘फरार’ घोषित केल्यानंतर अखेर ते गुरुवारी, २५ नोव्हेंबर रोजी हजर झाले. सकाळी ११ वाजता परमबीर सिंग यांनी कांदिवली गुन्हे शाखा युनिट 11 च्या कार्यालयात हजेरी लावली. वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या केबिनमध्ये डीसीपी आणि गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी सिंग यांची चौकशी सुरु केली. परमबीर यांच्यासोबत त्यांचे वकीलही होते. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या कार्यालयाबाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली.

परमबीर सिंग पाच गुन्हे दाखल

परमबीर सिंग यांच्यावर मुंबई आणि ठाणे येथे खंडणी आणि जातीवाचक शिवीगाळ तसेच इतर अनेक आरोपांखाली गुन्हे दाखल आहेत. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांना खंडणी आरोप प्रकरणात अटकेपासून संरक्षण दिले. त्याचवेळी न्यायालयाने त्यांना तपासात सहभागी होण्याचेही आदेश दिले.

काय आहे प्रकरण?

परमबीर सिंग यांच्याविरोधात एका पोलिस अधिकाऱ्यानेच तक्रार केली होती. खोट्या गुन्ह्याच्या माध्यमातून आपला छळ केल्याचा आरोप करत अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत पोलिस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी गुन्हा दाखल केला होता. परमबीर सिंग हे ठाण्याते पोलिस आयुक्त असताना कल्याण-डोंबिवली महापालिकेतील बिल्डरांच्या एका भ्रष्टाचार प्रकरणातील अनेक आरोपींची नावे वगळण्याच्या त्यांच्या दबावाला मी बळी पडलो नाही. म्हणून माझ्याच विरोधात अनेक खोटे गुहा  दाखल करायला लावून त्यांनी आपली प्रचंड छळवणूक केली, असे घाडगे यांचे म्हणणे आहे.

(हेही वाचा भाजपाची एसटी आंदोलनातून माघार, कामगार मात्र संपावर ठाम!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here