नवले ब्रिज या ठिकाणची आपघाताची मालिका काही केल्या थांबत नाही. रविवारी रात्री एका ट्रक चालकाने तब्बल २५ वाहनांना उडवले होते. या भीषण अपघातात १२ जण जखमी झाले होते. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला होता. या अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या ट्रक चालकाला अखेर अटक करण्यात आली आहे.
(हेही वाचा – Google layoff: अॅमेझॉन, मेटानंतर ‘या’ कंपनीकडून १० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार)
काय आहे प्रकरण
नवले पुलाजवळील अपघाताला कारणीभूत ठरणारा फरार ट्रक चालक मनीराम यादव असे या अटक करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. तो रविवारी रात्री अपघात झाल्यावर फरार झाला होता. या प्रकरणाचा तपास वाहतूक उपाआयुक्त करत आहेत. रविवारी सातारा येथून भरधाव वेगाने मानिराम यादव हा (एपी 02 टीई 5858) ट्रक घेऊन वेगाने निघाला होता. खेडशिवापुर बोगदा ओलंडल्यावर उतारावर यादव याने ट्रक बंद करत न्यूट्रल केला होता. तीव्र उतारामुळे ट्रकचा वेग वाढला. हा ट्रक नवले पूल या ठिकाणी येताच यादव याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि तब्बल २४ वाहनांना उडवले. या भीषण अपघातात १२ जण जखमी झाले. अपघातानंतर ट्रकचालकाने मदत न करता फरार झाला. यामुळे पोलिस त्याचा शोध घेत होते.
याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तसेच, या अपघाताची मुख्यमंत्र्यांनीही दखल घेत कारवाईचे आदेश दिले होते. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली व अखेर आज ट्रक चालकाला पकडण्यात यश आले आहे. चाकणमधून मनीराम यादव याला ताब्यात घेतले आहे.
Join Our WhatsApp Community