सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्युयॉर्क (सियुएनवाय) अंतर्गत बीएमसीसी हे अमेरिकेतील सर्वात मोठे सामाजिक महाविद्यालय आणि एसएनडीटी महिला विद्यापीठ यांच्यात शैक्षणिक सहकार्य करार करण्यात आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन मुंबई येथे बुधवारी या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
यावेळी न्यूयॉर्क येथील बीएमसीसी सामाजिक महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. अँथनी मन्रो व महाविद्यालयाचे विद्यार्थी नोंदणी व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संजय रामदत्त, अमेरिकेच्या प्रतिनिधी, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु डॉक्टर उज्वला चक्रदेव, प्रकुलगुरु प्रो. रुबी ओझा, कुलसचिव डॉ विलास नांदवडेकर, डॉक्टर नितीन वाणी व विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयांचे प्राचार्य तसेच विभागप्रमुख उपस्थित होते. यावेळी आंतरराष्ट्रीय शिक्षणातील संधी व आव्हाने या विषयावर चर्चासत्र देखील संपन्न झाले.
( हेही वाचा: शक्तिप्रदर्शनानंतरही बच्चू कडू यांना राज्य मंत्रिपद; भरत गोगावलेंना महामंडळावर समाधान मानावे लागणार? )
Join Our WhatsApp Community