गुजरातच्या नवसारीमध्ये कार आणि बसची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला असून, 28 जण जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरु केले.
नवसारी जिल्हा पोलीस अधिका-यांनी अपघाताची माहिती देताना सांगितले की, अपघातात जखमी झालेल्या 11 जणांना नवसारी येथील जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर इतर 17 जणांवर वलसाड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर गंभीर जखमी झालेल्या प्रवाशाला सुरतच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी उपस्थित पोलीस अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झाल्यानंतर बसचालकाला मोठा धक्का बसला. बसचालकाला ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
( हेही वाचा: महापालिकेच्या भूखंडावरील इमारतींच्या विकासाला गती, आखले नवीन धोरण )
जखमींवर उपचार सुरु
मिळालेल्या माहितीनुसार, बस अहमादाबाद शताब्दी महोत्सवासाठी प्रवाशांना वलसाड येथे घेऊन जात होती. दरम्यान, रेश्मा गावाजवळ एका फाॅर्च्युनर कार आणि बसची धडक झाली. या अपघातानंतर रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. एक क्रेनच्या साहाय्याने बसला बाजूला घेण्यात आले. पोलीस तपास करत असून, जे प्रवाशी किरकोळ जखमी आहेत, त्यांच्यावर उपचार करुन घरी सोडण्यात आले. तर गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Join Our WhatsApp Community