घाटकोपरमध्ये भीषण अपघात, OLA चालकाची रिक्षा, टेम्पोसह दुचाकीला धडक, ८ जणांना उडवलं

मुंबईतील घाटकोपरमध्ये एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. बुधवारी एका ओला चालकाने तब्बल ८ जणांना उडवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपरमधील सुधा पार्क परिसरात हा भीषण अपघात झाला असून या अपघातात तीन रिक्षा, १ टेम्पो आणि दोन दुचाकीस्वारांना या ओला चालकाने धडक दिली आहे. यामध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

(हेही वाचा – Patra Chawl Case: पत्राचाळ प्रकरणी पवारांनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले “…आम्ही तयार आहोत पण”)

या भीषण अपघातानंतर हा ओला चालक वाहन वेगाने चालवत होता का, की त्याने कोणत्या प्रकारची नशा केली होती, चालकाचा ताबा सुटला का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. मात्र याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र या चालकाने तब्बल ८ जणांना उडवल्याचे सांगितले जात आहे.

साधारण बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला असून या अपघातात जखमी झालेल्यांना घाटकोपरमधील राजवाडी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या ओला चालकाचे नाव राजू यादव असून हा चालक अपघात झालेल्या परिसरातच राहणारा असल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात चालकाची गाडी अचानक वेगाने धावू लागली त्यामुळे रस्त्याच उभ्या असलेल्या अनेक वाहनांना त्यांनी धडक दिली. या गंभीर प्रकारानंतर पोलिसांनी या ओला चालकाला ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here