मोटारीत मोबाईल चार्जिंग करणे बेतले असते सात जणांच्या जीवावर!

83
मोटारीत मोबाईल चार्जिंगला लावण्याच्या नादात बुधवारी दुपारी घाटकोपर येथे मोठा अपघात झाला. या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले असून तीन रिक्षांचे मोठे नुकसान झाले आहे. जखमींना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे.
राजू यादव (४२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. राजू हा रिक्षा चालक असून बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गरोडिया नगर, या ठिकाणी उभा होता.
त्याच्या मोबाईल फोनला चार्जिंग नसल्यामुळे त्याने जवळच उभ्या असलेल्या टुरिस्ट मोटारीत मोबाईल चार्जिंगला लावण्यासाठी गेला. मोटार सुरू करून  मोबाईल चार्जिंगला लावत असताना अचानक गियर ओढला गेला आणि मोटार पुढे जाऊ लागल्यामुळे गोंधळलेल्या राजूकडून ब्रेक दाबण्याऐवजी एक्सलेटर दाबले गेले आणि मोटार सुसाट पुढे जाऊन पादचारी व तीन रिक्षांना धडक देऊन ५० मिटर अंतरावर जाऊन थांबली.
हा विचित्र अपघात घाटकोपर पूर्व गारोडिया नगर, पुष्पक जंक्शन या ठिकाणी झाला. या अपघातात जखमी झालेल्या सातही जणांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजेंद्र बिंद(४९),सपना सनगरे(३५),आदित्य सनगरे (९), वैष्णवी काळे वय (१६), जयराम यादव, (४६) श्रध्दा सुशविरकर (१७),  भरतभाई शहा (६५) असे जखमींची नावे आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.