पुण्यात भीषण अपघात: कंटेनरने चार रिक्षांना उडवले, एकाचा मृत्यू तर तीन गंभीर जखमी

85

पुण्यातील हडपसर परिसरात मोठा अपघात झाला आहे. एका कंटेनरने एकाच वेळी चार रिक्षांना धडक दिली आहे. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. रिक्षात अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कंटनेरच्या खाली अडकलेल्या रिक्षा क्रेनच्या सहाय्याने काढण्यात आल्या आहेत.

( हेही वाचा: केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या नावाने फेसबुक अकाउंट उघडून केली पैशांची मागणी, गुन्हा दाखल )

अपघात झालेल्या स्थळी पोलीस आणि अग्निशामक दल दाखल झाले आहेत. सध्या बचावकार्य सुरु आहे. माहितीनुसार, सोलापूरवरुन भरधाव वेगाने हा काॅन्क्रिट मिक्सर ट्रक येत होता. या परिसरातील मोठ्या झाडांना धडक दिली आणि त्यानंतर हडपसरच्या गाडीतळ परिसरातील उभ्या असलेल्या रिक्षांना काॅन्क्रिट मिक्सर ट्रक धडकला. या धडकेत रिक्षंचा चक्काचूर झाला आहे.

अपघातानंतर काॅन्क्रिट मिक्सर ट्रकचा चालक फरार झाला आहे. तर क्लिनरचा या अपघातात मृत्यू झाला आहे. गंभीर जखमींवर जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.