Pune Accident: नवले पुलावर सिमेंट काँक्रीटचा ट्रक पलटी

पुण्यातील अपघातांचे हॉटस्पॉट ठरलेल्या कात्रज-देहूरोड बाह्यमार्गावर कात्रजकडून-नवले ब्रीजकडे जाणाऱ्या मार्गावर शिवसृष्टीसमोर सकाळी साडे अकराच्या सुमारास रेडिमिक्स सिमेंट काँक्रीटचा मिक्सर पलटी झाल्याची माहिती मिळतेय. कात्रजकडून नवलेपुलाच्या दिशेने येत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला आहे.

अपघातात दोन जण जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, सिमेंट काँक्रीटचा मिक्सर एका कारवर पलटी झाला. या घटनेत दोन जण जखमी झाले असून चारचाकी गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मारुती पवार, (वय ५० वर्षे) व माधुरी पवार ( रा. नांदेडसिटी) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळची वेळ असल्याने या अपघातामुळे वाहतूक कोंडी देखील झाली. या घटनेनंतर भारती विद्यापीठ वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झालेत.

(हेही वाचा – “अयोध्या दौरा हा राजकारणाचा विषय नाही तर…”)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here