जळगाव शहरात मेहरुण तलाव परिसरात एक धक्कादायक घटना घडली. दोन कारमध्ये लागलेली शर्यत अकरा वर्षीय शाळकरी मुलाच्या जीवावर बेतली. कारची धडक लागून झालेल्या या भीषण अपघातात मुलगा सायकलसह दहा फूट उंच फेकला जाऊन खाली पडला आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला. जळगाव शहरात रविवारी ही घटना घडली. या घटनेत पोलिसांनी कार चालक मुलांसह कार मालकाला ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
जळगाव शहरातील मेहरुण तलाव परिसरात असलेल्या ट्रॅकवर दोन कारमध्ये शर्यत लागली होती. त्याच परिसरात राहणारा विक्रांत मिश्रा हा त्यावेळी सायकल चालवत होता. या शर्यतीदरम्यान, दुस-या कारला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचवेळी या परिसरात सायकलवर खेळत असलेला विक्रांत मिश्रा अचानक सायकलवरुन कारसमोर आला. भरधाव वेगात असणा-या तरुणाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्यात ब्रेक दाबवण्याऐवजी वेग वाढवण्याचे एक्सलेटर दाबले गेल्याने कारचा वेग आहे त्यापेक्षा दुपटीने वाढला. परिणामी कारची जबर धडक विक्रांत मिश्रा असलेल्या सायकलला लागली. यात जबर दुखापत झाल्याने, विक्रांतचा जागीच मृत्यू झाला. तर सायकर मात्र झाडावर अडकून पडली.
( हेही वाचा: नोएडासारखेच मुंबईतील अनधिकृत टाॅवर्सवर कारवाई करा; सोमय्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी )
आरोपी अटकेत
अपघातात विक्रांत गंभीर जखमी झाल्याने, गाडीतील 3 तरुणांनी त्याला तातडीने दवाखान्यात नेले परंतु तोपर्यंत त्या मुलाचा मृत्यू झाला होता. या घटनेत मिश्रा परिवारातील एकुलता एक असलेला अकरा वर्षीय विक्रांत मिश्रा याच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी तीन तरुणांना ताब्यात घेतले आहे.
Join Our WhatsApp Community