रस्त्याच्या कडेला झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावरुन नेली गाडी – पुण्यातील धक्कादायक घटना

150

पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात रस्त्याच्या कडेला झोपलेल्या एका व्यक्तीच्या अंगावर अज्ञात व्यक्तीने भरधाव वेगातील गाडी नेली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. मार्केट यार्ड पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 20 एप्रिलच्या रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

अधिक तपास सुरु

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार चालकाने हलगर्जीपणाने भरधाव वेगात कार चालवून रस्त्याच्या कडेला झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर घातली. या अपघातातील व्यक्ती गंभीर जखमी झाल्याने, कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. मार्केटयार्ड पोलिसांनी या प्रकरणी किया सेल्टास कार एमएच 12 एस क्यू 9425 या क्रमांकाच्या कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

( हेही वाचा: म्हाडाच्या 2800 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत, या तारखेपासून करु शकता अर्ज )

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.