आणखी एका खासगी बसचा भीषण अपघात; अनेक प्रवासी गंभीर जखमी

138

जालना औरंगाबाद रोडवर एका खासगी बसचा भीषण अपघात झाला. भरधाव बस पहाटेच्या सुमारास उलटली. ओव्हरटेकिंग करताना, बस अपघातग्रस्त झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात 7 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. पुण्याहून रिसोडकडे खासगी ट्रॅव्हल्स बस जात होती. बालाजी ट्रॅव्हल्स कंपनीची ही बस होती. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बालाजी ट्रॅव्हल्सच्या बसचा अपघात झाला.

या भीषण अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु, 7 प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

( हेही वाचा: अजित पवार यांच्या मागे ईडीच्या चौकशीचा फेरा? कोणत्या घोटाळ्याचा आरोप? )

अपघाताचे कारण काय?

ओव्हरटेक करत असताना, भरधाव वेगात असलेली खासगी बस रस्त्यावरील डिव्हायडरच्या कठड्यावर आदळली. कठड्यावर आदळताना बसचा वेग प्रचंड होता. त्यामुळे ही बस रस्त्यावरच उलटली. या अपघातामुळे रस्त्यावरील एक बाजू पूर्णपणे ब्लाॅक झाली होती. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडीदेखील झाली. या अपघातात बसचेही मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. तसेच, क्रेनच्या मदतीने पोलिसांनी अपघातग्रस्त बस रस्त्यावरुन बाजूला केली. या अपघाताप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी पोलिसांनी बस चालकाविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.