गोंदियात ‘भगत की कोठी’ ट्रेनला अपघात; 50 हून अधिक प्रवासी जखमी

110

रायपूरकडून नागपूरच्या दिशेने जाणा-या भगत की कोठी या ट्रेनला गोंदिया शहरालगत अपघात झाला. यावेळी समोरुन जात असलेल्या मालगाडीला भगत की कोठी ने मागून धडक दिली. या अपघातानंतर या ट्रेनचा एक डब्बा रुळाखाली घसरला. या अपघातात 50 च्या वर प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना पहाटे 4 च्या दरम्यान घडल्याचे सांगण्यात येत आहे.

सिग्नल व्यवस्थित न मिळाल्याने अपघात?

मालगाडीला भगत की कोठी ट्रेन ने मागून धडक दिली तेव्हा ट्रेनचा एक S3 डब्बा रुळाखाली घसरला. अपघातात 53 च्या वर लोक जखमी तर 13 किरकोळ जखमी झाले आहेत. एकाच ट्रॅकवर दोन ट्रेन नागपूरच्या दिशेने जात होत्या, भगत की कोठी ट्रेनला ग्रीन सिग्नल मिळाल्याने, ही गाडी समोर निघाली होती, मात्र याच रुळावर मालगाडी समोर चालत असताना, गोंदिया शहराला लागून असलेल्या रेल्वे गेटवर सिग्नल व्यवसत्थित न मिळाल्याने भगत की कोठी ही ट्रेन मालगाडीला धडकली अशी माहिती आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.