मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. पुण्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, 6 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे एक्स्प्रेसवर वाहतुकीची कोंडी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खोपोलीजवळ बोरघाटात कंटेनरने एका खाजगी बसला मागून धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, बसच्या मागील भागाचा चुराडा झाला आहे. तर कंटेनरचेही मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात बस चालकाचा मृत्यू झाला असून, एक प्रवासी गंभीर जखमी आहे. जखमींना पनवेलच्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले आहे. 10 ते 12 किरकोळ जखमींना घटनास्थळावर प्राथमिक उपचार केले जात आहेत.
( हेही वाचा: मुंबईतील विक्रोळीत भीषण अपघात; तीन जण गंभीर जखमी )
कंटेनरची बसला जोरदार धडक
मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर ढेकू गावानजीकच्या उतारावर हा अपघात घडला आहे. मुंबईकडे येणा-या मार्गावर बोरघाटात बसला भरधाव टेम्पोने मागून धडक दिल्याने बसचा मागचा भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. कंटेनर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कंटेनर बसच्या मागच्या बाजूला जोरात जाऊन धडकला. या अपघातात बसच्या मागच्या बाजूचा पूर्णपणे चुरा़डा झाला असून, बस चालकाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. या बसमधून जवळपास 37 हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. बसमधील तीन ते चार प्रवासी गंभीर जखमी आहेत.
सिंधुदुर्ग येथे लग्नाला ही बस गेली होती. कोल्हापूरमार्गे वाशिंदला परतत असताना बसला अपघात झाला आहे. तर, कंटेनर हा कोल्हापूरहून वाशिंदला जात होता. जखमींना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर 10 ते 12 किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरु आहेत.
Join Our WhatsApp Community