एका पोलीस कर्मचाऱ्याचा चालत्या रेल्वे गाडीत चढताना तोल गेल्याने पाय घसरून रेल्वेखाली सापडल्याने मृत्यू झाला. ही घटना परभणी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. दत्ताराम श्रीराम घाग (५२, रा.पोलीस वसाहत, परभणी) असे मयत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
दत्ताराम घाग हे बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास परभणी स्थानकावर आले. हैदराबाद येथून औरंगाबादकडे जाणारी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म दोनवर उभी होती. ही रेल्वे निघताना दत्ताराम घाग हे चालत्या गाडीत चढत होते. त्यावेळी त्यांचा तोल गेला. यात ते रेल्वेखाली सापडल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
( हेही वाचा: LED टीव्हीचा ब्लास्ट; 16 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी )
Join Our WhatsApp Community