पुणे-अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात; 5 जणांचा जागीच मृत्यू

109

पुणे अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. चुकीच्या बाजूने आलेला ट्रक अचानक रोडच्यामध्ये आल्याने कारची ट्रकला धडक बसली आणि हा अपघात झाला. अपघातात कारमधील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी आहे. पुणे येथील रांजणगाव एमआयडीसीतील LG कंपनीसमोर हा भीषण अपघात झाला आहे.

ट्रक चालकाच्या चुकीमुळे हा अपघात घडला आहे. ही कार पुण्याहून पनवेलकडे निघाली होती. यावेळी पुणे- अहमदनगर मार्गावर एक ट्रक चुकीच्या बाजूने आला. ट्रक अचानक रस्त्याच्यामध्ये आल्याने कारची ट्रकला जोरदार धडक बसली. या अपघातात कारमधील पाचही जणांचा मृ्त्यू झाला. याशिवाय कारमधील एक प्रवासी गंभीर जखमी असून त्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

( हेही वाचा: मुंबई-पुणे महामार्गावर वाढते अपघात; आता वाहनांवर राहणार ITMS सिस्टिमची नजर )

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.