मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर दोन मालवाहू ट्रकचा अपघात

मुंबई- पुणे एक्स्प्रेसवेवर बोरघाटात दोन मालवाहू ट्रकचा अपघात झाला आहे.  पुण्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर ट्रक पलटी झाला. बोरघाटात खोपोलीच्या हद्दीत ही घटना घडली आहे. सिमेंटची वाहतूक करणाऱ्या ट्रकला तांदूळ वाहतूक करणाऱ्या ट्रकने मागून धडक दिल्याने तांदळाचा ट्रक एक्स्प्रेसवेवर आडवा झाला.

यामुळे सर्वत्र तांदुळच तांदूळ द्रुतगती मार्गावर विखुरला होता. या अपघातात ट्रकमधील चालक आणि क्लिनर आत अडकले होते. जखमींना बाहेर काढण्यात देवदूत रेस्क्यू, आयआरबी कर्मचारी आणि महामार्ग पोलिसांना यश आले. मात्र या अपघातामुळे काही काळ मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती.

( हेही वाचा: आता जनरल तिकीट घेऊन मेल आणि एक्सप्रेसमधून करा प्रवास )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here