उत्तराखंडमध्ये अर्टिगा कार नदीत कोसळून 9 जणांचा मृत्यू; तर बचावलेली महिला शाॅकमध्ये

132

उत्तराखंडमध्ये मोठा कार अपघात झाला आहे. एक अर्टिगा कार नदीत वाहून गेली. ढेला नदीत ही कार कोसळली आणि वाहून गेली. या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला असून, या अपघातात थोडक्यात बचावलेली महिला सध्या शाॅकमध्ये आहे. दुर्घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. या कार दुर्घटनेत जीव गमावलेले सर्वजण पंजाबमधील असल्याचे समजते. उत्तराखंडच्या नैनीताल येथील रामनगर इथे ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर, तातडीने यंत्रणा बचावकार्यासाठी धावल्या. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

( हेही वाचा: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सेवानिवृत्त वय वाढणार, पेन्शन रक्कमही वाढणार!  )

स्थानिक प्रशासनाच्या मदतीने बचावकार्य सुरु

समोर आलेल्या माहितीनुसार, सकाळी 9 वाजेपर्यंत चार मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. तर कारमध्ये अजूनही 5 मृतदेह अडकल्याचे सांगण्यात आले. हे मृतदेह काढण्याचे प्रयत्न केले जात होते. दरम्यान एका महिलेला सुरक्षित वाचवण्यात यश आले आहे. तिच्यावर सध्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रामनगर येथील रुग्णालयात या अपघातातून बचावलेल्या महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने बचावकार्य केले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.