नंदुरबारमध्ये ट्रॅव्हल्स आणि टेम्पोची धडक; ३ जण ठार, १७ जखमी

112

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात बायपास रस्त्यावर खासगी ट्रॅव्हल्स आणि आयशर टेम्पो यांची जोरदार धडक झाली आहे. या भीषण अपघातात तीन जण ठार झाले असून १७ जण गंभीर जखमी झाले आहेत.

ऊस तोडणी मजूर सांगलीकडे जात होते

शहादा शहरातील बायपास रस्त्यावर असणाऱ्या नवीन बस स्थानकाजवळ हा अपघात झाला आहे. आयशर टेम्पोमधील मजूर हे ऊस तोडणीसाठी सांगलीकडे जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर खासगी ट्रॅव्हल्समध्येही मजूर प्रवास करत होते. सदर मजूर कामासाठी गुजरातकडे जात होते. मात्र शहाद्यात टेम्पो आणि खासगी ट्रॅव्हल्सची समारोसमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच शहादा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. अपघात जखमी झालेल्या १७ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

(हेही वाचा भाजपचा राष्ट्रवादीला थेट बारामतीत दणका, या नेत्याने केला पक्ष प्रवेश)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.