माजी आरोग्यमंत्री डाॅक्टर दीपक सावंत यांच्या गाडीला अपघात झाला आहे. डंपरने दीपक सावंत यांच्या कारला धडक दिली आहे. डाॅक्टर सावंत शुक्रवारी सकाळी पालघरला जाण्यासाठी निघाले होते. यावेळी काशिमीरा भागात त्यांच्या कारला डंपरने धडक दिली. या अपघातात सावंत यांच्या मानेला आणि पाठिला दुखापत झाली असून त्यांच्या कारचेही मोठे नुकसान झाले आहे. डाॅक्टर सावंत यांना अॅम्ब्युलन्सने अंधेरीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सनगाई नाका येथे डंपर नंबर एम एच 48 ए 6866 व कार क्रमांक एम एच 03 बी डब्ल्यू 4224 चा अपघात झाला. या कारमध्ये असलेले माजी आरोग्य मंत्री डाॅक्टर दीपक सावंत जखमी झाले. डाॅक्टर सावंत यांना हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
( हेही वाचा: नाशिक गोळीबार प्रकरण: शिंदे गटाच्या नेत्याला अटक )
Join Our WhatsApp Community