नगर-सोलापूर महामार्गावर चार वाहनांचा अपघात; २ ठार, १० गंभीर जखमी

100

नगर सोलापूर महामार्गावर चार वाहनांचा भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत तालुक्यातील बोरुडे वस्ती येथे चार वाहनांचा गुरुवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून या घटनेत दहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

दहा गंभीर जखमींवर नगर येथे उपचार सुरू

नगर सोलापूर महामार्गावर कर्जत तालुक्यतील बोरूडे वस्ती येथे टी एन ८८ एक्स ९२४३ या क्रमाकांचा माल ट्रक सोलापूरकडून नगरच्या दिशेने जात होता. इतर वाहने नगरकडून सोलापूरच्या दिशेने जात होती. दुचाकी तसेच एमएच ०९ बीएम ९८५९ या क्रमांकाची क्रुझर, ॲपे रिक्षा यांचा अपघात झाल्याचे समोर आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत दुचाकीवर असणारे कोकणगाव, तालुका कर्जतमधील वय वर्ष २५ असणारे कृष्णा मल्हारी बोरुडे तसेच क्रुझरमधील सोपान दिनकर काळे हे दोघे जण जागीच ठार झाले. या अपघातात दहा जण गंभीर जखमी झाले असून या सर्व जखमींना नगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

(हेही वाचा – बेल की जेल? राणा दाम्पत्याच्या जामिनावर होणार शनिवारी सुनावणी)

पुणे सोलापूर महामार्गावर दोन वाहनांत धडक

यासह पुणे सोलापूर महामार्गावर दोन चार चाकी वाहनांमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींपैकी एकाची ओळख अद्याप पटलेली नाही. तर मृतांपैकी अन्य एका व्यक्तीचे नाव श्रणिक प्रभाकर होले असे असल्याची माहिती समोर आली आहे. श्रणिक हा २७ वर्षांचा होता. संकेत बाळासाहेब भंडलकर हा २१, सुनिल निळाराम शितकल २२,अनिल बाळासाहेब जाधव २२ अशी जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.