देवदर्शन करून पुण्याकडे जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला! लक्झरी बसचा भीषण अपघात, ११ प्रवासी गंभीर जखमी

132

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मळद येथे खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाला आहे. या बसचा चालक मधधुंद अवस्थेत असल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि ८ एप्रिल रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही बस पलटी होऊन भीषण अपघात झाला. अपघातामध्ये ११ प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ताबा सुटल्याने ही बस मुख्य रस्ता व रस्त्याच्यामधील पावसाचे पाणी जाण्यासाठी असलेल्या जागी उलटली आणि हा भीषण अपघात झाला.

( हेही वाचा : सर्वसामान्यांना खुशखबर! CNG आणि PNG च्या दरात कपात, नवे दर किती?)

ग्रामस्थांच्या सतर्कतेने प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश

अपघातातील सर्व प्रवासी भवानी पेठ पुणे परिसरातील आहेत. सोमवारी दिनांक ३ एप्रिल २०२३ रोजी, आनंद ट्रॅव्हल्स कंपनीची बस (एमएच १२ एफसी ९०५५) या ५० प्रवाशांना घेऊन देवदर्शनासाठी निघाली होती. कोल्हापूर, तुळजापूर, येडाई, अक्कलकोट येथील देवदर्शन करून पुण्याकडे परतत‌ असताना हा अपघात झाला. ग्रामस्थांच्या सतर्कतेने प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. गंभीर व काही किरकोळ जखमी असलेल्या प्रवाशांना दौंड आणि भिगवण येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी पाठवण्यात‌ आले आहे. बसमधून ४९ प्रवासी प्रवास करत होते. सर्व प्रवासी पुण्यातील असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.