मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात मोठा अपघात झाला आहे. मुंबईकडून खेडच्या दिशेने जाणाऱ्या नियंत्रण सुटल्याने कार दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. हा अपघात मंगळवारी सकाळी ६ वाजताच्या सुमापात धामणदेवा गावाजवळ घडला. या दुर्घटनेत चालकासह ६ जण जखमी झाले आहेत.
( हेही वाचा : संजय राऊतांची भाषा कैद्यांसारखी, जेलमध्ये जाऊन शिकले – चंद्रशेखर बावनकुळे )
कार दरीत कोसळली
कुर्ल्यातील सतीश जगताप हे कामानिमित्त कोकणात जात असताना ही दुर्घटना घडली आहे. कारमध्ये त्यांच्यासोबत पाच जण होते. कारवरील ताबा सुटल्याने कार दरीत कोसळली. यात सतीश जगताप गंभीर जखमी झाले आहेत. तसेच दीपाली कर्नाळे (६५), दामोदर कर्नाळे (७०), स्वराज कर्नाळे (१२), राजेश कर्नाळे ( ४८) यांना दुखापत झाल्याने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर गेल्या अनेक महिन्यांपासून अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. संरक्षक कठडे नसल्याने अनेकदा चालकाचे नियंत्रण सुटल्यावर वाहने थेट दरीत कोसळत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे संरक्षक कठडे उभारण्याची मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community