पुणे-मुंबई महामार्गावरील कात्रज-देहूरोड बाह्यवळण रस्त्यावर रावेत परिसरात भीषण अपघात झाला. यामध्ये एका ट्रकने रस्त्यावर काम करणाऱ्या पाच ते सहा कामगारांना चिरडले. त्यात एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना समीर लॉन्सजवळ सोमवारी 30 मे ला पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली.
…तर चार ते पाच कामगार गंभीर जखमी
पुणे-मुंबई महामार्गावर रस्त्याचे काम सुरू आहे. रात्रीदेखील हे काम सुरू होते. सोमवारी पहाटे रस्त्याचे काम करत असलेल्या कामगारांना पुण्याकडून येणाऱ्या एका ट्रकने उडवले. अपघात झाल्यानंतर, ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला. यात एका कामगाराचा जागेवर मृत्यू झाला, तर चार ते पाच कामगार गंभीर जखमी आहेत.
( हेही वाचा: व्लादिमीर पुतीन यांचा गंभीर आजारामुळे मृत्यू; ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेच्या दाव्याने खळबळ )
Join Our WhatsApp Community