सध्या Smartphone हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय बनला असून, तो एक अविभाज्य भाग आहे. अनेक लहान मोठ्या आठवणी या स्मार्टफोनमध्ये साठवल्या जातात. सध्या हातात मोबाइल असल्याने, प्रत्येकजण खास क्षण आठवणीत राहण्यासाठी फोटो काढत असतात. परंतु काही वेळेस अत्यंत महत्त्वाचा फोटो चुकून डिलिट होतो. अशा वेळी युजर्सचा मोठा हिरमोड होत असतो. महत्त्वाच्या आठवणी पुसल्या जात असल्याने, आता हा डाटा कसा रिकव्हर करावा असा प्रश्न निर्माण होतो. जाणून घेऊया काही ट्रिक्स…
( हेही वाचा: Amazon Prime, Hotstar,NetFlix मोफत हवंय? तर Jio देतंय हे भन्नाट प्लान )
या ट्रिक्स वापरुन असे करा फोटो रिकव्हर
- जर तुम्हाला फोनमधून डिलिट झालेले फोटो रिकव्हर करायचे असतील, तर तुम्ही यासाठी डिस्क रिकव्हरी टूलची मदत घेऊ शकता. Google play store वर तुम्हाला अनेक डिस्क रिकव्हरी टूल्स सहज सापडतील.
- तुमच्या मोबाइल फोनमध्ये हे टूल्स इन्स्टाॅल केल्यानंतर, तुम्ही चुकून डिलीट झालेले फोटो सहज रिकव्हर करु शकता, दरम्यान, डिस्क रिकव्हर टूल डाउनलोड केल्यानंतर, त्याची विश्वसनीयता तपासणेही अत्यंत आवश्यक असते.
- अनेकदा मोबाइलमधून चुकून फोटो डिलीट होतात. अशा परिस्थितीत जर तुमच्याकडून कोणताही फोटो चुकून डिलीट झाला असेल, तर तो फोटो आपल्या अल्बमच्या रिसेंटली डिलीट सेक्शनमध्ये असू शकतो. तेथून डिलीट केलेला फोटो तुम्ही सहज रिकव्हर करु शकता.
- इंटरनेटच्या जगात अनेक फेक डिस्क रिकव्हरी टूल्स उपलब्ध आहेत, ते फोनवर इन्स्टाॅल केल्यानंतर तुमचा खासगी डेटा लीक होऊ शकतो. अशा परिस्थितीत, ते डाउनलोड करताना, त्याची विश्वासार्हता तपासा.
- कुठलाही फोटो चुकून डिलीट झाल्यास तुम्ही तो रिकव्हर करण्यासाठी मानांकित टूल्सचा वापर करणे आवश्यक ठरते किंवा एखाद्या मोबाइल दुकानात जाऊनही तो डाटा रिकव्हर करु शकता.