राष्ट्रपती पदासाठी मतदान सुरू होण्यापूर्वी विधानभवनाच्या गेटवर BUS ला अपघात

टळली मोठी दुर्घटना

151

देशभरात राष्ट्रपती निवडणुकीसाठी आज सोमवारी मतदान होत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सर्व आमदार विधान भवनात मतदान करणार आहे. मात्र हे मतदान सुरू होण्यापूर्वीच मोठी दुर्घटना घडल्याची माहिती मिळतेय. राष्ट्रपती पदासाठी मतदान सुरू होण्यापूर्वी विधानभवनाच्या गेटवर बसला अपघात झाल्याची माहिती मिळतेय. विधानभवनात प्रवेश करत असताना बसचे छत विधानभवनाच्या मंडपाला धडकले. सुदैवाने या बसमध्ये कोणीही नव्हते, त्यामुळे मोठा अनर्थ टळला असल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – नोकरी करणा-या महिलांना लग्नासाठी पसंती नाही, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर)

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय आमदार विधानभवनात दाखल होत आहेत. दरम्यान, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून विधानभवनात मोठा मंडप लावण्यात आला आहे. विधानभवनाच्या प्रवेशद्वारासमोर आलेली एक लक्झरी बस या मंडपाला आदळली आणि बसला अपघात आला. यावेळी एका बाजूला पत्रकार परिषद सुरू होती, त्यावेळी ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी देशभर मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यावेळी NDA ने द्रोपदी मुर्मू यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर विरोधकांकडून यशवंत सिंहा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राज्यातील भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेना गटाचे १६५ आमदार आणि शिवसेना ठाकरे गटाचे १५ आमदार द्रोपदी मुर्मू यांना पांठिंबा देणार असून मतदान करणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील २०० आमदार मुर्मू यांना मतदान करतील, असे म्हटले होते. त्यामुळे अतिरिक्त २० आमदार कोणत्या पक्षातील क्रॅास व्होटींग करणार याची उत्सुकता असून राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसतेय.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.