केंद्राचा अहवाल सांगतो ‘ती’ च बाॅस

122

देशातील महिलांमध्ये शिक्षणामुळे आत्मविश्वास वाढला असून, त्या पैसा नेमका कुठे आणि कसा वापरायचा याचा निर्णय स्वत: घेत असल्याचे समोर आले आहे. याचवेळी महिलांच्या बॅंक अथवा बचत खात्यांचे प्रमाणही वाढले असून, त्या मोबाईलवरुन आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणावर करत आहेत.

केंद्राच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अहवालानुसार…

देशातील निम्म्या महिला (51 टक्के) पैसे कुठे आणि कसा वापरायचा याचा निर्णय घेतात. शहरी भागात हे प्रमाण 57 टक्के इतके आहे. तर ग्रामीण भागात हेच प्रमाण 48 टक्के आहे. 15 ते 19 वर्षांतील केवळ 35 टक्के मुली पैसे कुठे वापरायचे याचा निर्णय घेतात. मात्र, जसजसे वय वाढत जाते तसतसे महिलाच व्यवहारात आपला हक्क गाजवत असल्याचे, दिसून येते.

मोबाईलवरुन कुणाचे किती आर्थिक व्यवहार?

  • मोबाईल फोनवरुन आर्थिक व्यवहार करणा-या महिलांचे प्रमाण देशात 22.5 टक्क्यांवर पोहोचले आहे.
  • 31 टक्के शहरी भागात, तर 16.6 टक्के महिला आर्थिक व्यवहारांसाठी मोबाईलचा वापर करतात.
  • यातही विवाह न झालेल्या मुली आघाडीवर आहेत. राज्यात मोबाईलवरुन आर्थिक व्यवहार करणा-या महिलांचे प्रमाण 48.8 टक्के वर पोहोचले आहे.

( हेही वाचा: कोकणात २७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर ‘या’ वाहनांना बंदी )

केंद्राचा अहवाल

  • 80.9 टक्के शहरी महिलांकडे त्यांचे बॅंक अथवा बचत खाते आहे.
  • 77.4 टक्के ग्रामीण महिलांकडे त्यांचे बॅंक अथवा बचत खाते आहे.
  • 51.3 टक्के शरही महिलांना कर्ज कसे घ्यायचे याबाबत माहिती आहे.
  • 55 टक्के 30-49 वर्षे वयाच्या महिला या मोठ्या प्रमाणात कर्ज घेतात.
  • 54.4 टक्के महाराष्ट्रातील महिला आर्थिक व्यवहार सांभाळतात.
  • 71 टक्के महिला त्यांना मोबाईलवरील मेसेज वाचू शकतात.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.