Online व्यवहारांमध्ये भारतीय सर्वात हुशार!

128

Multy Factor Authentication म्हणजेच ‘एमएफए’ घेण्याच्या आणि वापराच्या बाबतीत भारत जगात सर्वाधिक आघाडीवर आहे. ऑफिसच्या बाहेरुन काम आणि Work From Home ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या प्रकरणांमुळे एमएफएचा वापर वाढत आहे.

काय आहे संशोधनात? 

संशोधन एजन्सी थेल्सच्या म्हणण्यानुसार, यावर्षी भारतात एफएफएचा वापर 19 टक्क्यांनी वाढला असून, येथे सर्वाधिक 66 टक्के लोक याचा वापर करत आहेत. तर जगात याचा वापर 56 टक्के लोक करत आहेत. दुस-या स्थानावर सिंगापूर आहे. जेथे 17 टक्के वाढीसह 64 टक्के लोक एमएफएचा वापर करत आहेत.

नेमकी कशी मिळते सुरक्षा?

एमएफए हे विशेष प्रकारचे सुरक्षा तंत्रज्ञान आहे. यामध्ये खाते लाॅग इन करण्यासाठी किंवा ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी क्रेडेन्शियल्सची पडताळणी करण्यासाठी अनेक पाय-या आणि पद्धतीचा समावेश आहे. Gmail मध्ये लाॅग इन करण्यासाठी गुगलचे Two factor Authentication हे देखील याचे एक उदाहरण आहे.

( हेही वाचा: “एक नेता, एक झेंडा, एक मैदान”… ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर लाॅन्च; पहा व्हिडीओ )

रिमोट वर्कर्सची मोठी पसंती

थेल्सच्या अहवालानुसार, जगभरातील 68 टक्के एमएफए रिमोट वर्कर्स वापरतात. 2021 मध्ये गैर-आयटी कर्मचा-यांमध्ये एमएफएचा कल 34 टक्के होता, जो यावर्षी 40 टक्के झाला आहे. जगभरातील 84 टक्के आयटी व्यावसायिकांनी रिमोट वर्कला सुरक्षित आणि सोपे करण्यासाठी त्यांच्या सुरक्षा प्रणालीवर विश्वास ठेवला आहे.

Password राहतो सुरक्षित

Single password क्रॅक करणे सोपे आहे. परंतु मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशनचे वैशिष्ट्ये म्हणजे यामुळे पासवर्ड सहजपणे क्रॅक होत नाही. त्यामुळे एफएफए हे वैशिष्ट्य आपल्या बॅंकिंग अॅप्समध्ये वापरले पाहिजे. या फीचरमध्ये यूजरला लाॅग इन करण्यासाठी पासवर्डही फिंगरप्रिंट स्कॅनर, ओटीपी, डेबिट कार्ड नबंर अशा अनेक गोष्टींची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत, बहु- स्तर सहजपणे तोडता येत नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.