सध्या अतिपाऊस, अतिउष्णतापमान, अतिथंडी असे चक्र सुरु आहे. हवामानात झालेल्या बदलांमुळे निसर्गचक्रात बदल झाला आहे. त्याचे विपरित परिणाम मानवी जीवनावर होत आहे. समोर आलेल्या अहवालानुसार, 2030 पर्यंत उन्हाच्या झळा तीव्र होत जाणार असून दरवर्षी किमान 560 नैसर्गिक संकटांचा सामना पृथ्वीवासीयांना करावा लागणार असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रांनी आपल्या अहवालात दिला आहे.
काय सांगतो अहवाल
- 2030 पर्यंत उष्णतेच्या लाटांचे प्रमाण तिपटीने वाढेल.
- दुष्काळाचे प्रमाण 30 टक्क्यांनी वाढेल
- गरीब देशांना प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावे लागले.
- लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमी होत जाईल.
आताच गंभीर दखल घेणे गरजेचे
हवामान बदलामुळे होणा-या परिणामांची आताच गंभीर दखल घेणे नितांत गरज आहे. नैसर्गिक संकटांचे प्रमाण कमी कसे होईल, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे आवश्यक आहे. अन्यथा नंतर होणार नुकसान भूतो न भविष्यची असेल, असे यूएनडीआरआरच्या प्रमुख मामी मिजुटोरी यांनी म्हटले आहे.
( हेही वाचा: रेल्वेमधील गर्दीमुळे पडून जखमी झाल्यास, रेल्वेच देणार नुकसान भरपाई! )
जागतिक अर्थव्यवस्थेचे नुकसान
नैसर्गिक संकटामुळे 1990च्या दशकात जगाला 70 अब्ज डाॅलरचे नुकसान झाले होते. आता हे प्रमाण 170 अब्ज डाॅलरपर्यंत पोहोचले आहे. हवामान बदलामुळेच नैसर्गिक संकटेच नव्हे तर कोरोना महामारी, आर्थिक संकटे व खाद्यान्नांची टंचाई यांमध्येही वाढ होत असून परिस्थिती चिंताजनक असल्याचेही अहवालात म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community