कोरोना साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे २०२० मध्ये मुंबईत गुन्ह्याच्या प्रमाणात मोठी घट झाली होती. मात्र २०२१ मध्ये नियम शिथिल करण्यात आल्यानंतर गुन्ह्याच्या संख्येत पुन्हा वाढ झाल्याचे मुंबई पोलिसांच्या वार्षिक अहवालावरून समोर आले आहे. मुंबई पोलिसांकडून मंगळवारी २०२१ वार्षिक अहवाल सादर करण्यात आला आहे.या अहवालात मुंबईत झालेल्या गुन्ह्याची तसेच उघडकीस आलेल्या गुन्ह्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. ज्या प्रमाणात गुन्हे वाढले असले तरी गुन्हे उघडकीस आणण्याची टक्केवारी देखील वाढली आहे.
२०२१ चा वार्षिक अहवाल मुंबई पोलिसांकडून प्रसिद्ध
२०१९ ते २०२१ या वर्षातील शहरातील गुन्ह्यांची आकडेवारी आणि ट्रेंड शेअर करणारा २०२१ चा वार्षिक अहवाल मुंबई पोलिसांनी मंगळवारी प्रसिद्ध केला. अहवालानुसार, २०२१ या वर्षात संपूर्ण शहरात ३३,८१३ गुन्हे दाखल झाले, त्यापैकी २२,५१९ गुन्हे उघडकीस आले आहे. टक्केवारीत पाहिल्यास ६७ % गुन्हे उघडकीस आले आहे. तोच २०२० मध्ये २८,२४४ प्रकरणे नोंदवली गेली ज्यापैकी १७,५९३ गुन्हे उघडकीस आले होते म्हणजे ६२ टक्के गुन्ह्याची उकल करण्यात आली होती. २०१९ मध्ये ४१,५९० गुन्हे नोंदवले गेले होते तर २८,४६७ गुन्ह्याची उकल करण्यात आली होती.
(हेही वाचा – राऊतांचा सोमय्यांवर निशाणा; म्हणाले “…Wait and watch” )
गुन्हयाची उकल करण्यात मुंबई पोलिसांना यश
२०२१ मध्ये शहरात घडलेल्या दरोड्यांच्या गुन्हयाची उकल जवळ जवळ पूर्ण करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. वर्षभरात नोंदवण्यात आलेले १६ दरोड्याचे गुन्ह्याची उकल करण्यात आली आहे. २०२० मध्ये दरोड्याच्या गुन्ह्यापैकी एक गुन्हा अद्यापही उघडकीस आलेला नाही. खुनाच्या प्रकरणांचा तपास (९९ % तपास), खुनाचा प्रयत्न (९७%), दुखापत (९३ %), दरोडा (९२ %) सर्वोत्तम तपास करण्यात आला आहे.
ही आकडेवारी मुंबई पोलिसांसाठी चिंताजनक
मुंबई पोलिसांसाठी सर्वात कमी म्हणजे ४०% तपास चोरीच्या गुन्ह्यात झाला असल्यामुळे ही आकडेवारी मुंबई पोलिसांसाठी चिंताजनक आहे. २०२१ मध्ये पोलीस ठाण्यात ४५३४ चोरीच्या गुन्ह्यांची नोंद झाली असून त्यापैकी १८७० गुन्ह्यांची उकल झाली आहे. २०१९ (३६%) आणि २०२० (३५ %) पासून चोरीच्या घटना उघडकीस आणण्यात यश आले होते मात्र २०२१ मध्ये ही संख्या काहीशी समाधानकारक आहे. बहुतेक प्रकरणे उघडकीस आलेले नाही. चिंतेचे आणखी एक कारण म्हणजे मोटार वाहन चोरीचा तपास दर ४७ % आहे. २०२१ मध्ये शहरातून ३२८२ वाहने चोरीला गेली असून त्यापैकी १५९९ वाहने जप्त करण्यात आली आहेत. २०२० मध्ये समान संख्या, २८०१ वाहने चोरीला गेली होती त्यापैकी १०८५ वाहने जप्त करण्यात आली होती.
शारीरिक गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले अन् तपास वाढला
कोविड काळाच्या तुलनेत शहरात खून, खुनाचा प्रयत्न, दुखापत, बलात्कार, हुंडाबळी यासारखे शारीरिक गुन्हे कमी झाले आहेत. सन २०१९ मध्ये १२,०३० शारीरिक गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती, ज्यापैकी १०,५४० उघडकीस आले (८८% तपास), तर २०२१ मध्ये, ९७४० अशी प्रकरणे नोंदवली गेली, त्यापैकी ८७०३ प्रकरण उघडकीस आली म्हणजे ९० टक्के गुन्ह्याची उकल झाली आहे.
लॉकडाऊनमुळे, अनेक रहिवासी २०२० मध्ये मोठ्या कालावधीसाठी घरी होते, म्हणून आम्ही २०२१ च्या अहवालाची मागील वर्षाशी तुलना करू शकत नाही. त्यामुळे, २०२१ ची २०१९ शी तुलना करणे योग्य ठरेल, जे असे सूचित करते की प्रकरणे कोविडपूर्व काळात वाढली असली तरी, तपासात सुधारणा झाली आहे. आम्ही गुन्हे रोखणे आणि तपास करणे याच्यावर अधिक भर देत आहोत, असे मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community