दहशतवादी प्रशिक्षणासाठी भारतातून पाठवल्या गेल्या 300 मुली; राज्यांना अलर्ट

देशाच्या वेगवेगळ्या भागांतून सुमारे 300 मुली पाकिस्तानात मध्य- पूर्व मार्गाने पाठवण्यात आल्याचा संथय केंद्रीय यंत्रणांना आहे. पाठवण्यात आलेल्या या मुलींना दहशतवादी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जम्मू काश्मिरमध्ये सतत अशांतता राहावी यासाठी पाकिस्तानच्या आयएसआय गुप्तचर संघटनेकडून गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करण्यात येत आहेत.

राज्यांना अलर्टPa

निर्यात केलेल्या मुलींची संख्या 300 पर्यंत असावी, असा अंदाज व्यक्त करीत यात धर्मांतरीत मुलींचाही यामध्ये समावेश असण्याची शक्यता केंद्रीय यंत्रणांनी वर्तवली आहे. या दृष्टीने सर्व राज्यांना महिनाभरापूर्वीच सतर्क करण्यात आले आहे. 100 मुलींना यापूर्वी दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले आहे. 700 महिलांना पाकिस्तानच्या विविध भागांतील कॅम्पमध्ये दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देत असल्याचे 2009 मध्ये समोर आले होते.

हनी ट्रॅपचा वापर

प्रशिक्षणानंतर दहशतवादी हल्ले व महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींना हनी ट्रॅपमध्ये ओढण्यासाठी त्यांचा वापर केला जाऊ शकतो, असा अंदाज आहे.

( हेही वाचा: पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे ‘हा’ वाहतूक मार्ग बंद; ‘या’ पर्यायी मार्गांचा करा वापर)

मुलींचा ठावठिकाणा शोधला जातोय

राज्यातील यंत्रणा हरवलेल्या व्यक्तींचे रजिस्टर शोधून यातील किती मुली परत मिळाल्या. तसेच, हरवल्या पण त्यांची नोंद नाही, याची माहिती मिळवत आहेत. धर्मांतर करुन लग्न केलेल्या मुलींचा विशेष शोध घेतला जात आहे. तसेच परदेशी रवाना झालेल्या मुलींचाही ठावठिकाणा शोधण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here