अदानी समुहाचे संस्थापक आणि अध्यक्ष असलेलले गौतम अदानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार, अदानी आता जगातील पाचव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. अदानी यांची एकूण संपत्ती 123.3 अब्ज डाॅलर्स इतकी आहे. त्यांनी वाॅरन बफेट यांना मागे टाकून पाचवे स्थान पटकावले जाते. या यादीनुसार, गौतम अदानी यांनी रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मागे टाकत आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा बहुमान पटकावला आहे.
इलाॅन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
या यादीत टेस्लाचे प्रमुख इलाॅन मस्क पहिल्या क्रमांकावर आहेत. त्याची एकूण संपत्ती 269.70 अब्ज डाॅलर्स इतकी आहे. जेफ बेझोस 170.2 अब्ज डाॅलर्सच्या संपत्तीसह दुस-या स्थानावर आहेत. फ्रान्सच्या बर्नार्ड अर्नाल्ट आणि त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती 166.8 अब्ज डाॅलर्स एवढी आहे आणि या यादीत ते तिसरे आहेत.
( हेही वाचा: तुम्ही घेतलेल्या लसीचा प्रभाव अजूनही आहे का? )
अदानींची एकूण संपत्ती
फोर्ब्सकडून रिअल टाईम अब्जाधीशांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीनुसार, गौतम अदानी हे आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. वर्षभरात त्यांच्या खासगी संपत्तीत एकूण 12 अब्ज डाॅलर्सची वाढ झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती 122.8 अब्ज डाॅलर्स वर पोहोचली आहे. त्यांनी या बाबतीत आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांना मागे टाकले आहे. अदानी हे जगातील पाचवे श्रीमंत व्यक्ती बनले असून, त्यांची एकूण संपत्ती 122.8 अब्ज डाॅलर्सवर पोहोचली आहे.
Join Our WhatsApp Community