राज्यात कोरोना रुग्णांना डिस्चार्ज मोठ्या संख्येने मिळत असल्याने गुरुवारी रुग्ण बरे होण्याची टक्केवारी सुधारल्याची सुखदवार्ता आरोग्यविभागाने दिली. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९६.७ टक्क्यांवर नोंदवले गेल्याचे आरोग्यविभागाकडून सांगण्यात आले.
राज्यातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीतील घट कायम असून, उद्यापर्यंत राज्यभरात केवळ दीड लाखांच्या जवळपास रुग्ण आढळतील, असे आशादायी चित्र आहे. गुरुवारी राज्यात १ लाख ५८ हजार १५१ रुग्ण राज्यभरातील विविध भागांत उपचार घेत होते. त्या तुलनेत बुधवारी राज्यात सक्रीय रुग्णांची संख्या १ लाख ७३ हजार २२१ वर होती. ही घट आता कायम राहील, अशी माहिती आरोग्य विभागाच्यावतीने दिली गेली.
(हेही वाचा – अँटिलिया आणि मनसुख हिरेन प्रकरणात लवकरच होणार गौप्यस्फोट! )
गुरुवारी राज्यात नव्या रुग्णांमध्ये केवळ १५ हजार २५२ रुग्ण आढळले, तर दुप्पटीने ३० हजार २३५ रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला.
राज्यात ओमायक्रॉनचे १, ४०५ रुग्ण
राज्यात गुरुवारी ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नवी नोंद आढळली नाही. सध्या राज्यात १ हजार ४०५ ओमायक्रॉनच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
Join Our WhatsApp Community