…तर तुमचा अंगठा होईल वाकडा; जाणून घ्या कारण

139

इंडिया मोबाईल ऑफ गेमिंगच्या अहवालानुसार, भारतीय लोक आठवड्यातून सरासरी 8 तास 36 मीनिटे मोबाईल गेम खेळण्यात घालवतात. 60 टक्के लोक एकावेळी सतत 3 तास गेम खेळतात. मोबाईल गेमच्या व्यवसात उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र, राजस्थान दुस-या आणि तिस-या क्रमांकावर आहे. बिहार चौथ्या आणि पश्चिम बंगाल पाचव्या क्रमांकावर आहे.

सतत मोबाईल गेममुळे अंगठा वाकडा होण्याची भीती डाॅक्टरांनी व्यक्त केली आहे. ही सवय कमी करण्यासाठी तत्काळ उपाय करण्याची गरज निर्माण झाली आहे.

( हेही वाचा: मुंबईत आत्मघाती हल्ल्याचा कट?; संशयित दहशतवादी पोलिसांच्या ताब्यात )

कोणते आजार होतात?

  • अंगठ्याची हालचाल करणा-या टेंडनना सूज
  • मोबाईल गेम खेळणा-यांची बोटे सुजल्यामुळे वाकडी होतात किंवा वाकतात आणि ती सरळ करता येत नाहीत
  • कोपराभोवती सूज येते
  • जास्त गेमिंगमुळे डोळ्यांवर दाब
  • उदासीनता व डिप्रेशन होऊ शकते
  • हिंसक वृत्ती वाढते, जास्त चिडचिड किंवा स्वभाव रागीट होतो.

काय कराल?

  • गेमिंगचे व्यसन असल्यास मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
  • कौटुंबिक समुपदेशन: व्यसनाधीन व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना आणि जवळच्या मित्रांना रुग्णाला कसे हाताळायचे हे समजावून सांगितले जाते.
  • मानसशास्त्रज्ञांच्या मते, सहसा वेळ घालवण्यासाठी गेम खेळायला सुरुवात होते, पण याचे सवयीमध्ये आणि नंतर व्यसनामध्ये रुपांतर होते व जीवनाचा महत्त्वाचा भाग बनते, हे खेळणा-याला कळत नाही.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.