मुंबई भ्रष्ट्राचारात देशात दुस-या क्रमांकावर, वाचा काय सांगतो अहवाल?

111

देशातील आर्थिक गुन्ह्यांमध्ये कमालीची वाढ झाली असून यंदा एकूण 60 हजार कोटींची प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आर्थिक घोटाळे करण्यात दुस-या क्रमांकावर तर महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर आहे. आर्थिक गुन्ह्यांमध्ये विश्वासघाताने मालमत्ता बळकावणे, अफरातफर, फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करुन तसेच बनावट नोटा चलनात आणून आर्थिक फायदा उठवला जातो. विजय माल्या, नीरव मोदी यांच्यासह अनेक आरोपींनी हजारो कोटींची फसवणूक करुन देशाबाहेर पलायन केल्याने गेल्या काही वर्षांमध्ये आर्थिक गुन्हेगारीची चर्चा वाढली आहे.

मागच्या तीन वर्षांत झाली वाढ

नॅशनल क्राईम रेकाॅर्ड ब्युरोचा क्राईम इन इंडिया अहवालानुसार, 2020 मध्ये देशात एकूण आर्थिक गुन्ह्यांची संख्या 1.45 लाख होती. वर्षभरात नोंदवलेल्या सर्व आयपीसी गुन्ह्यांपैकी हे प्रमाण सुमारे 3.4 टक्के आहे. अर्थात कोरोना साथीमुळे या वर्षी 29 टक्के घट झाली. हा अपवाद वगळता 2017 ते 2021 या कालावधीतील आकडेवारी दरवर्षी वाढत आहे. आर्थिक गुन्ह्यांमधील टक्केवारीत राजस्थान आणि उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्राने देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्रात दरवर्षी किमान 12 हजार कोटींच्या आर्थिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. 2018 साली ती 6.54 टक्क्यांनी वाढून 14 हजार 654 वर पोहोचली तर 2019 मध्ये ती 15 हजार 686 वर पोहोचली. याचा अर्थ असा की राज्यस्तरावर आणि महाराष्ट्रातील शहर पोलीस दल स्तरावर आर्थिक गुन्हे शाखा स्थापन करण्यात आली असूनही गेल्या तीन वर्षांत राज्यात तब्बल 12.51 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

( हेही वाचा: नाशिकजवळ पवन एक्स्प्रेसला मोठा अपघात )

मुंबई शहरात सर्वाधिक प्रमाण 

मुंबईत वर्षाला 6 हजार कोटी रुपयांच्या आर्थिक गुन्ह्यांची नोंद होते. शेअर, रिअल इस्टेट, बॅंका, गुंतवणूक योजना याद्वारे मुंबईत मोठ्या प्रमाणावर फसवणूक करुन कोट्यवधी रुपये लुटले जात आहेत. 2020 मध्ये मुंबईत 3 हजार 927 प्रकरणे नोंदवली गेली, तर नवी दिल्लीत 4 हजार 445 प्रकरणे नोंदवली गेली, 2019 च्या तुलनेत 29 टक्के प्रमाण कमी होते. तर 2019 साली मुंबई शहरात सर्वाधिक म्हणजे 5 हजार 556 आर्थिक गुन्ह्यांचे प्रमाण लाख लोकसंख्येमागे 30.02 होते. त्यानंतर पुण्यात 934 गुन्हे आणि नागपूरमध्ये 452 गुन्हे दाखल आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.