पर्यटनात दक्षिण आशियात भारत अव्वल

133

कोरोना काळानंतर, आता पर्यटन क्षेत्र हळूहळू बहरु लागले आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आर्थिक मंचाने जारी केलेल्या जागतिक प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांकात भारताने दक्षिण आशियामध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. मात्र असे असेल तरी २०१९ मध्ये ४६ व्या स्थानावर असलेल्या भारताची घसरण होऊन संपूर्ण यादीत भारत ५४ व्या स्थानी गेला आहे.

या गोष्टी ठरल्या अनुकूल

जागतिक प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांकात दक्षिण आशियात पर्यटनाच्या क्षेत्रात भारत अव्वल ठरला आहे. कोरोना काळात भारतात लसीकरणाचा वेग वाढल्याने, देशांतर्गत आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळांना मिळणारी वाढती पसंती यामुळे पर्यटन क्षेत्राला चालना मिळाली आहे. पर्यटकांच्या पसंतीतही बदल झाला आहे. त्यानुसार, व्यावसायिकही बदल करत आहेत. याचाही लाभ होत आहे.

वर्ल्ड इकाॅनाॅमिक फोरमच्या अंदाजानुसार, जानेवारी 2021 आणि जानेवारी 2022 मधील आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या संख्येतील फरक अहवालात स्पष्ट करण्यात आला आहे.

( हेही वाचा: 38 वर्षांपूर्वी त्या तुफान रात्रीने घेतले होते 11 हजार लोकांचे जीव )

पहिले दहा देश

जागतिक क्रमवारीत जपानने अव्वल स्थान पटकावले असून, त्यानंतर अमेरिका, स्पेन, फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, यूके, सिंगापूर आणि इटली पहिल्या दहामध्ये आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.