श्रीमंत महिला, मॉडेल्स यांना प्रेमात अडकवून तो करायचा ‘हे’ कृत्य

150

श्रीमंत घरातील महिला आणि मॉडेल यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवून यांच्याकडून लाखो रुपये उकळणाऱ्या एकाला ओशिवरा पोलिसांनी ओडिशा राज्यातून अटक केली आहे. अटक करण्यात आलेला मुस्ताफ खान हा मागील १५ वर्षांपासून फरार होता व त्याने १३ महिलांची या प्रकारे फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

तीन लाख घेवून फरार झालेला

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुस्ताक खान हा एका कार कंपनीत काम करायचा, दुबईतील बिझनेस मॅन असल्याचे भासवून लग्नाच्या बहाण्याने मुंबईतील एका मॉडेलवर त्याने बलात्कार केला, एवढेच नाही तर मुस्ताक खानने तिच्याकडून तीन लाख घेवून फरार झाला होता. मुस्ताक खान हा ओडिशातमध्ये राहत होता, अशी माहिती मिळाल्यावर ओशिवरा पोलिस त्याला अटक करण्यासाठी गेले होते, मात्र तो मिळाला नव्हता.

(हेही वाचा पुलाचे काम स्थगित तरी ३ महिने बॅरिकेड्सने रस्ता बंद! भाजपाचे आंदोलन)

गेल्या आठवड्यात केली अटक

गेल्या आठवड्यात ओशिवरा पोलिसांचे एक पथक पुन्हा त्याला अटक करण्यासाठी ओडिशाला दाखल झाले होते. मात्र शेजार पाजाऱ्यांनी पोलिसांच्या पथकाला घेराव घालून त्याला अटक करण्यासाठी विरोध केला होता, मात्र पोलिस पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने मुस्ताकला अटक करून त्याला ट्रान्झिट रिमांडसाठी ओडिसा न्यायालयात हजर केले असता न्यायालयात देखील मुस्ताक याच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला होता. मात्र न्यायालयाने मुस्ताक याची कोठडी ओशिवरा पोलिसांनी दिली. ओशिवरा पोलिसांनी ओडिशा पोलिसांच्या पथकाच्या मदतीने मुस्ताक याला नागपूरपर्यंत आणले, तेथून पुढे ओशिवरा पोलिस सोमावरी त्याला मुंबईत घेऊन आले.

डझनभर महिलांना सावज बनवले

मुस्ताक हा कारच्या शोरूममध्ये येणाऱ्या महिलांशी मैत्री करायचा, त्यानंतर तो दुबईच्या मोठ्या व्यावसायिकाशी बोलून महिलांना प्रभावित करायचा. त्यानंतर लग्न करण्याचे अमिष दाखवून महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवून त्यांच्याकडून मोठ्या रकमा उकळून फरार होत होता. सूत्रानुसार, मुस्ताकने मुंबईतच डझनभर महिलांना आपले सावज बनवले आहे. ओशिवरा पोलिसांनी आरोपीकडे याबाबत चौकशी सुरू आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.