व्यापाऱ्याला ब्लॅकमेल करण्यासाठी पत्नीलाच लावले दाव्यावर!

83

गँगस्टर छोटा शकीलचा साथीदार आणि परमबीर सिंग यांच्यासह एका प्रकरणातील आरोपी रियाज भाटी हा सध्या फरार आहे. रियाज भाटी याने पत्नीचा वापर करून एका व्यापाऱ्याला हनीट्रॅपमध्ये अडकवले, आणि २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या व्यापाऱ्याने रियाज भाटी यांच्याविरुद्ध वर्सोवा पोलीस ठाण्यात रविवारी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करून केला असून अधिक तपास सुरू आहे.

असा घडला प्रकार

अंधेरी पश्चिम वर्सोवा येथे राहणारे सोन्याचांदीचे व्यापारी आणि शेअर्स मार्केटमधील गुंतवणूकदार यांची १ वर्षांपूर्वी त्याच परिसरात राहणारा रियाज भाटी याच्यासोबत ओळख झाली होती. माझी पोलीस दल आणि राजकीय पुढाऱ्यांसोबत उठबैस असते, असे सांगून काही राजकीय पुढारी यांच्यासोबतच छायाचित्र भाटीने या व्यापाऱ्याला दाखवले. रियाज भाटी याच्यावर विश्वास ठेवून व्यापारी आणि रियाज भाटी यांच्यात चांगली मैत्री झाली होती. जानेवारी २०२१ मध्ये पीडित व्यापाऱ्याच्या एका मित्राने व्यापाऱ्याला एका महिलेचे छायाचित्र पाठवून रियाजने हा फोटो पाठवला असल्याचे सांगून ती शारीरिक संबंध ठेवायला तयार आहे, मी तिच्यासोबत संबध ठेवले असल्याचे सांगितले. रियाज भाटी हा त्या महिलेला घेऊन वर्सोवातील एका हॉटेलमध्ये येणार आहे, तू पण ये… असे त्याने पीडित व्यापारी याला सांगितले.

(हेही वाचा – कॅप्टन अभिनंदन यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते ‘वीर चक्र’ने सन्मान!)

त्याच दिवशी सायंकाळी रियाज भाटी एका महिलेसोबत व्यापाऱ्याच्या घराजवळ आला व तिघेही कारमधून एका हॉटेलमध्ये गेले या हॉटेलमध्ये एक खोली बुक करून चौघेही जण त्या खोलीत गेले. दरम्यान रियाज भाटीने महिलेला १ लाख रुपये द्यावे लागणार असल्याचे सांगितले. या व्यापाऱ्याची महिलेसोबत चांगली ओळख झाल्यानंतर सर्वांनी मद्यपान केले आणि मद्याच्या नशेतच सर्वजण हॉटेलच्या खोलीत विवस्त्र अवस्थेत नाचले. त्यानंतर रियाजने या महिलेसोबत पीडित व्यापारी याला बेडरूममध्ये पाठवले. दोन दिवसांनी पुन्हा त्याच महिलेला दुसऱ्या हॉटेलवर आणले गेले व तिला एक लाख रुपये देऊन मौजमजा केली. दहा दिवसांनी रियाज भाटी याने या व्यापाऱ्याला बोलावले आणि असे सांगितले की,  ‘एक लफडा झाला आहे, या महिलेने आपले सर्वांचे तिच्यासोबतचे व्हिडीओ शूटिंग काढले असून ती २५ लाख मागत आहे.’ व्यापाऱ्याने रियाज भाटीला १४ लाख रुपये देऊन प्रकरण मिटवून टाक आणि तिच्याजवळचे सर्व व्हिडीओ क्लिप डिलीट करण्यास सांगितले.

‘ब्लॅकमेल करण्यासाठी माझा पती माझा वापर करतो’

काही दिवसांनी या महिलेने पीडित व्यापाऱ्याच्या मित्राला फोन करून तुम्हा दोघांना मला भेटून काही तरी सांगायचे आहे, असे सांगून एका हॉटेलवर बोलावले व तिने तिचे नाव सांगून ती रियाज भाटी याची पत्नी असल्याचे सांगितले. हे ऐकून या व्यापाऱ्याला धक्काच बसला. माझा यामध्ये काही दोष नाही, पैसे कमवण्यासाठी व इतरांना ब्लॅकमेल करण्यासाठी माझा पती माझा वापर करतो. मी नकार दिल्यावर मला मारझोड करतो असे तीने पीडित व्यापारी आणि त्याच्या मित्राला सांगितले. रियाझ भाटी याने आपली फसवणूक केली असल्याचे कळताच व्यापाऱ्याने वर्सोवा पोलीस ठाण्यात रियाज भाटी विरोधात तक्रार दाखल केली. वर्सोवा पोलिसांनी रियाज भाटी यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.