चित्रा वाघ यांच्या तक्रारीची दखल; मुंबई पोलिसांची उर्फी जावेदला नोटीस

गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ ( Chitra Wagh) आणि उर्फी जावेद (Urfi Javed) यांच्यामध्ये कोल्ड वाॅर सुरु आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या फॅशनवर टीका केली तर उर्फीने वाघ यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. उर्फी जावेदवर तत्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी पोलिसांकडे केली होती. आता चित्रा वाघ यांच्या तक्रारीची मुंबई पोलिसांनी दखल घेतली आहे. सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन प्रकरणी मुंबई पोलिसांनी उर्फी जावेदला नोटीस पाठवली आहे.

सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी उर्फी जावेदला नोटीस पाठवली आहे. अंबोली पोलीस ठाण्यात उर्फी जावेदची चौकशी होणार आहे. उर्फीला शनिवारी हजर होण्याची नोटीस जारी करण्यात आली आहे. चित्रा वाघ यांच्या तक्रारीची मुंबई पोलिसांनी दखल घेतली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शैला कोराडे या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.

( हेही वाचा: एसटी कामगारांचे वेतन रखडले; अजित पवारांनी सदावर्तेंचे कान उपटले  )

ट्वीट करत कारवाईची केली मागणी

चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन उर्फीच्या फॅशनवर टीका केली होती. काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी एक ट्वीट शेअर केले होते. या ट्वीटमध्ये चित्रा वाघ यांनी लिहिले होते, ‘मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी बिभत्स आणि किळसवाणे अंगप्रदर्शन करत फिरणा-या उर्फी जावेदवर तत्काळ कायदेशीर कारवाई करावी.’

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here