राज्यात गाजलेला राज्य परीक्षा परिषदेने टीईटी गैरव्यवहार प्रकरणी ७ हजार ८८० उमेदवारांवर कारवाई केली आहे. या कारवाईमुळे या सर्वांना शिक्षक पात्रता परीक्षा देता येणार नाही.
आयुक्त तुकाराम तुपे यांच्यासह मोठ्या अधिकाऱ्यांना अटक करण्यात
राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत २०१९-२०२० मध्ये हा सर्वात मोठा घोटाळा झाला. या घोटाळ्याच्या प्रकरणी पुणे सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या घोटाळ्याच्या प्रकरणी शिक्षण परिषद आयुक्त तुकाराम तुपे यांच्यासह मोठ्या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. या घोटाळ्याच्या प्रकरणी सायबर पोलिसांनी कोट्यवधींची संपत्ती ताब्यात घेतली आहे. ७८८० उमेदवारांमधील २९३ उमेदवारांनी जी बनावट प्रमाणपत्र तयार केली होती आणि ते आज सेवेत आहे, अशा उमेदवारांना देखील बडतर्फ करण्यात येणार आहे.
(हेही वाचा महापालिका तिरंगा ध्वज खरेदीसाठी मोजणार १८ रुपये २५ पैसे; पण मुंबईकरांना मिळणार मोफत)
या उमेदवारांना आता कधीही परीक्षा देता येणार नाही
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने एक ४८० पानी पत्रक जाहीर केले आहे. विशेष म्हणजे यात परिषदेने गैरव्यवहार करणाऱ्या ७८८० उमेदवारांची यादीच जाहीर केली आहे. यात परीक्षा दिलेल्या या उमेदवारांना आता कधीही परीक्षा देता येणार नाही. ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्यांची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ज्यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात येणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ (१९ जाने. २०२०) च्या परीक्षेमध्ये झालेल्या गैरप्रकारामुळे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांच्या जर नियुक्त्या झाल्या असतील तर त्यांची सेवा तात्काळ संपविण्यात यावी. आणि याची नोंद नियुक्त्या झालेल्या विभागांनी घ्यावी असे आदेश या पत्रकात देण्यात आले आहेत.