पुण्यात MPSC परीक्षेदरम्यान विद्यार्थी गैरप्रकार करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर पोलिसांनी या उमेदवाराला ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात MPSC कडून ट्वीट करण्यात आले आहे. MPSC परीक्षा पास करणे अत्यंत कठीण असते यामुळे ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थी प्रचंड मेहनत घेतात. म्हणून या परीक्षेला कॉपी होऊ नये म्हणून आयोग विशेष खबरदारी घेते.
( हेही वाचा : ‘हिंदूंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केलात तर जशास तसं उत्तर देऊ’, नितेश राणेंचा इशारा)
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021 संयुक्त पेपर 1 शनिवार ६ ऑगस्टला घेण्यात आला. आयोजित परीक्षेच्या विविध उपकेंद्रांच्या ठिकाणी आयोगाच्या दक्षता पथकाने संशयित उमेदवारांची तपासणी केली. त्यामध्ये पुणे जिल्हा केंद्रांवरील नऱ्हे येथील उपकेंद्रावर केवलसिंग चैनसिंग गुसींगे या उमेदवाराकडे गैरप्रकाराच्या उद्देशाने लपवलेले मोबाईल फोन व ब्ल्यूटूथ इयर फोन इत्यादी साहित्य सापडले. सदर उमेदवारावर आयोगाच्या कार्यालयाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Communityमहाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021-संयुक्त पेपर 1 करीता आज रोजी आयोजित परीक्षेच्या विविध उपकेंद्रांच्या ठिकाणी आयोगाच्या दक्षता पथकाने संशयित उमेदवारांची तपासणी केली.
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) August 6, 2022