…म्हणून व्हॉट्सअ‍ॅप, गुगलच्या २२ लाख भारतीय यूजर्सच्या अकाऊंटवर बंदी!

गुगलने केली मोठी कारवाई

देशात सर्वाधिक वापरले जाणारे आणि सर्वाधिक युजर्स असणारे सोशल मीडिया अ‍ॅप्लिकेशन म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप. मात्र याच युजर्सवर मोठी कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे. नव्या अटी-नियमांनुसार व्हॉट्सअ‍ॅप आणि गुगलच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गुगल आणि व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सवर मोठी कारवाई झाली आहे. सप्टेंबरमध्ये, नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल साधारण ७६ हजार ९६७ युजर्सवर गुगलने ही कारवाई केली असून त्यांना ब्लॉक केले आहे. दुसरीकडे, फेसबुकच्या मालकीच्या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपने साधारण २२ लाख व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट्सवर बंदी घातली आहे. गुगल आणि व्हॉट्सअ‍ॅपने त्यांच्या महिन्याने सादर होणाऱ्या अहवालात यासंदर्भातील खुलासा केला आहे.

गुगलने केली कारवाई

सप्टेंबर महिन्यात गुगलला युजर्सकडून २९ हजार ८४२ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी गुगलला ७६ हजार ९६७ युजर्सचा कंटेन्ट चुकीचा असल्याचे आढळून आले आणि त्यामुळे त्यांना ब्लॉक केले गेले. गुगलने आपल्या मासिक अहवालात यासंदर्भातील खुलासा केला आहे. गुगलने ऑटोमेटेड रूटच्या माध्यमातून ४,५०,२४६ युजर्सचा चुकीचा कंटेन्ट ओळखला आहे. यातील बहुतांश तक्रारी थर्ड पार्टीशी संबंधित आहेत, ज्या स्थानिक नियमांच्या विरोधात आहेत. तसेच काही तक्रारी पेटंट आणि पायरसीच्या असल्याचे समोर आले आहेत.

गुगलला किती तक्रारी मिळाल्या…

  • कॉपीराइट – ७६,४४४
  • ट्रेडमार्क-४९३
  • ग्राफिक सेक्सुअल कंटेन्ट -११
  • कोर्ट ऑर्डर-१०
  • काउंटरफीट – ५

मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅपने २२ लाखांहून अधिक व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट बॅन केले आहेत. कंपनीने सांगितले की, युजर्सची सुरक्षा आणि सुरक्षितता बघता या अकाऊंटवर बंदी घालण्यात आली आहे. बॅन केलेल्या अकाऊंटची संख्या २२ लाख ९ हजार आहे. व्हॉट्सअ‍ॅपनुसार, सप्टेंबरमध्ये ५६० यूजर्सच्या तक्रारी आल्या.

(हेही वाचा – केंद्रीय कर्मचाऱ्यांनो आता वेळेत कार्यालयात पोहोचा! कारण…)

‘या’ व्हॉट्सअप तक्रारींवर झाली कारवाई

  • अकाऊंट सपोर्ट – १२१
  • अपील – ३०९
  • इतर सपोर्ट आणि प्रोडक्ट सपोर्ट – ४९
  • सेफ्टी – ३२

व्हॉट्सअ‍ॅपने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅपने गेल्या काही वर्षांत त्यांच्या प्लॅटफॉर्मवर सुरक्षित ठेवण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स आणि इतर तंत्रज्ञान, डेटा सायंटिस्ट आणि तज्ज्ञांमध्ये सतत गुंतवणूक केली आहे. जेणेकरून याद्वारे ऑटोमेटेड रूटच्या माध्यमातून बनावट पोस्ट आणि कंटेन्टची ओळख होण्यास मदत होणं सोयिस्कर होईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here