संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमणाबाबत वनमंत्र्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

124

बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमणांबाबत अखेर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपली भूमिका जाहीर केली. स्थानिक राजकीय नेत्यांच्या मदतीने कृती योजना मिळाल्यास अतिक्रमणाबाबत निश्चितपणे तोडगा काढता येईल, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उद्यानात कार्यक्रमाप्रसंगी दिली. त्याचवेळी अतिक्रमणग्रस्तांच्या पुनर्वसनासंंबंधीही सकारात्मक पातळीवर विचार केला जाईल, असे आश्वासनही मुनगंटीवार यांनी दिले.

(हेही वाचा – शिवसेना उद्धव ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर पुढील सुनावणी होणार ‘या’ तारखेला!)

उद्यानात गुजरात येथील सक्कबाग प्राणिसंग्रहालयातील आणलेल्या सिंहाच्या जोडीला पर्यायी पिंज-यात सोडण्यात आले. या प्रसंगी उद्यानातील अतिक्रमणाच्याविषयीही आपले मत मांडले. यावेळी कार्यक्रमाला खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रकाश सुर्वेदेखील उपस्थित होते. या सर्वांनी मिळून अतिक्रमणाचे निर्मूलन करण्यासाठी कृती आराखडा दिल्यास निश्चितपणे कार्यवाही करता येईल, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. मे महिन्यात वनाधिका-यांनी पोलिसांच्या मदतीने साईबंगोडा येथील अतिक्रमण हटवले होते. या भागांत दारुभट्ट्याही सापडल्या होत्या. त्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडून अद्यापही कोणतीही अतिक्रमणाची कारवाई झालेली नाही. उद्यानातील कृष्णगिरी उपवनात त्यानंतर अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु वनाधिका-यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला.

काय म्हणाले मुनगंटीवार

पृथ्वीच्या जडणघडणीत देवाने आर्किटेक्टची भूमिका निभावली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे ईश्वराची देणगी आहे. या अमूल्य वसुंधरेच्या संवर्धनाची जबाबजदारी सारे मिळून सांभाळू, असे मुनगंटीवार म्हणाले. तंत्रज्ञानाच्या मदतीनेही उद्यानात विविध उपक्रम राबवता येतील, या मुद्द्यावर भाष्य करताना मुनगंटीवार म्हणाले की, उद्यानातील वनराणी ही केवळ पर्यटन आणि मनोरंजनाचे माध्यम राहू नये. वनराणीतून विविध विषयांवर आदान-प्रदान होण्याच्या प्रयत्न असावा. चंद्रपूरात अलीकडेच टॉकिंग ट्री हा उपक्रम सुरु करण्यात आला. याच पद्धतीने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातही वेगवेगळे उपक्रम राबवता येतील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.